लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिल्लोड येथे अभिवादन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, अशोक कांबळे, सखाराम अहिरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नानासाहेब गायकवाड, विजय खाजेकर, राजू साठे, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, अशोक बनसोड, बबलू पठाण, मोहसीन पठाण, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख जावेद, प्रशांत क्षीरसागर, मधुकर गवळी, अंकुश पाटील, सुधाकर बनकर, मेघाताई शहा, शेख सलीम हुसेन, अक्षय मगर, शिवा टोम्पे, जगन्नाथ कुदळ, विष्णू सोनवणे, साहेबराव सोनवणे, रवींद्र महाले, किसन सौदागर, राजेंद्र गोफणे, सुनील अहिरे, महिंद्र अहिरे, संजय कांबळे, बाबुराव अहिरे, साहेबराव अहिरे, किशोर भिसे, दीपक कांबळे, विष्णू सौदागर, ज्ञानेश्वर अहिरे, रमेश अहिरे, मनोज धनके, विशाल कांबळे, विशाल अहिरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.